पंचायत समिती सिन्नर

पंचायत समिती सिन्नर , ई -मेल

bdosinnar2024@gmail.com

पंचायत समिती सिन्नर, संपर्क क्रमांक

9673727816 (ग.वि.अ संपर्क क्रमांक) 8378870338 (सहा.ग.वि.अ संपर्क क्रमांक)

संपूर्ण पत्ता -

सिन्नर , नाशिक जिल्हा, महाराष्ट्र

कार्यालय वेळ स. १०:००AM ते सायं. ०५:००PM

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान रात्र सभा

नाविन्यपुर्ण उपक्रम

विविध योजना

कृषी विभाग योजना माहिती

🌾 कृषी विभाग, पंचायत समिती सिन्नर अंतर्गत योजना माहिती

अ.नं. योजनेचे नाव / तपशील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
अनुसूचित जातीसाठी लागू
लाभ:
  • नवीन सिंचन विहीर पॅकेज
  • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
  • शेततळे अस्तरीकरण पॅकेज
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत / बाहेरील)
अनुसूचित जमातीसाठी लागू
लाभ:
  • नवीन सिंचन विहीर पॅकेज
  • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
  • शेततळे अस्तरीकरण पॅकेज
योजनेसाठी शेतकऱ्यांकडे SC/ST जातीचा सक्षम प्राधिकाऱ्याचा प्रमाणपत्र असणे आवश्यक.
शेतकऱ्याचे क्षेत्रफळ किमान ०.४० हे. ते जास्तीत जास्त ६.०० हे. असावे.
अधिक माहितीसाठी कृपया कृषी अधिकारी (विघयो), पंचायत समिती सिन्नर यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्हा परिषद सेस योजना
५०% किंवा मर्यादित अनुदानावर कृषी अवजारे व बी-बियाणे DBT (थेट लाभ हस्तांतरण) द्वारे खरेदीसाठी.
राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रम
बायोगॅस संयंत्रासाठी अनुदान.
नैसर्गिक आपत्ती (उदा. जळीत) ग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सेस अंतर्गत मर्यादित अनुदान.
रमाई घरकुल योजना माहिती

🏠 प्रधानमंत्री / रमाई / इंदिरा आवास घरकुल योजना – पंचायत समिती, सिन्नर

अ.क्र. माहितीचा प्रकार तपशील
1 लाभार्थी पात्रते संबंधी अटी व शर्ती ग्रामसभेने मंजूर केलेले लाभार्थी. लाभार्थ्यांकडे पक्के घर नसावे व यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
2 पात्रता ठरविण्याची कार्यपद्धती
  • लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा.
  • मासिक उत्पन्न ₹10,000 पेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील कोणीही यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
  • ग्रामसभेची मंजुरी आवश्यक.
  • स्वतःच्या मालकीची जागा असावी किंवा संमती पत्र सादर करावे.
3 लाभ मिळविण्याची कार्यपद्धती पात्र लाभार्थी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव सादर करतात. पंचायत समिती स्तरावर संकलनानंतर प्रस्ताव मा. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक यांच्याकडे पाठवले जातात. त्यानंतर जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेकडून प्रशासकीय मंजुरी दिली जाते आणि ₹1,20,000 तीन हप्त्यांमध्ये वाटप केला जातो.
4 लाभाची विस्तृत माहिती
  • घरकुल बांधकामासाठी ₹1,20,000/- (एक लाख वीस हजार).
  • मजुरीसाठी 90 दिवस × ₹246 = ₹22,000/- (बावीस हजार) शासनाकडून अदा.
5 अनुदान वाटपाची कार्यपद्धती
  • प्रथम हप्ता – House Sanctioned
  • द्वितीय हप्ता – Plinth Level
  • तृतीय हप्ता – Lintal Level
6 चौथा हप्ता / अंतिम हप्ता Completed – बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंतिम हप्ता दिला जातो.
7 विनंती अर्जासाठी शुल्क निशुल्क (कोणतेही शुल्क नाही)
8 तक्रारी निवारण गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सिन्नर
9 संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सिन्नर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

📌 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM)

अ.क्र. कार्यक्रमाचे नाव अनुदान नियम व अटी कार्यपद्धती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) • राज्य शासन: ₹15,000
• केंद्र शासन: ₹15,000
• खेळते भांडवल समूहाच्या मूल्यांकनानुसार
१) समूह किमान ३ महिने जुना असावा
२) आवश्यक कागदपत्रे:
  • अ. गटाचे पासबुक
  • ब. आधार कार्ड
  • व. वैयक्तिक पासबुक
  • स. RF मूल्यांकन फॉर्म
गावातील कार्यरत ICRP व प्रभाग समन्वयक मूल्यांकन करून प्रस्ताव तालुका कक्षाकडे पाठवतात. जिल्हा कक्षाकडून निधी थेट समूहाच्या खात्यात वर्ग केला जातो.
समूहांना कर्ज पुरवठा किमान ₹1 लाख ते कमाल ₹20 लाख आवश्यक कागदपत्रे:
  • १) कर्ज मागणी अर्ज
  • २) समूहाचे बँक पासबुक
  • ३) आधार कार्ड
  • ४) वैयक्तिक पासबुक
  • ५) पासपोर्ट साईझ फोटो
  • ६) ग्रुप फोटो
  • ७) समूहाचे लेखे
ICRP व प्रभाग समन्वयक कर्ज मागणी प्रस्ताव तालुका कक्षाकडे पाठवतात. बँक पोर्टलवर ऑनलाइन नोंद केल्यानंतर समूहाच्या ऐपतीनुसार कर्ज मंजूर होते.
समुदाय गुंतवणूक निधी (CIF) ₹60,000 (प्रति समूह) सूक्ष्म गुंतवणूक आराखडा (MIP) आवश्यक • ६ महिने जुना समूह MIP तयार करतो.
• ग्राम संघाकडे CIF साठी मागणी अर्ज.
• उपसमिती प्रस्ताव तपासून मासिक सभेत मंजुरी देते.
• प्रभाग संघ → तालुका अभियान कक्ष → जिल्हा कक्ष असा प्रवास.
• निधी क्रमशः प्रभाग संघ → ग्राम संघ → समूह → सदस्य याप्रमाणे वर्ग केला जातो.
पशुसंवर्धन विभाग योजना - पंचायत समिती, सिन्नर

📌 पशुसंवर्धन विभाग योजना - पंचायत समिती, सिन्नर

अ. क्र. योजनेचे नाव लाभार्थी प्राधान्य लाभ / अनुदान गट किंमत
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी २ दुधाळ देशी / २ संकरीत गायी / २ म्हशी गट वाटप महिला बचत गटातील लाभार्थी, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार • सर्वसाधारण प्रवर्ग: गट किंमतीच्या ५०% अनुदान
• अनुसूचित जाती/जमाती: गट किंमतीच्या ७५% अनुदान
• रु.७०,०००/- प्रती गाय
• रु.८०,०००/- प्रती म्हैस
• २ दुधाळ गायी गट: ₹1,56,850/-
• २ म्हशी गट: ₹1,79,258/-
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत अंशतः ठाणबद्ध पद्धतीने शेळी / मेंढी पालन दारिद्र्यरेषेखालील, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट • सर्वसाधारण प्रवर्ग: ५०% अनुदान
• अनुसूचित जाती/जमाती: ७५% अनुदान
• १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा गट वाटप
• उस्मानाबादी/संगमनेरी: ₹1,03,545/-
• स्थानिक शेळी: ₹78,231/-
• मडग्याळ मेंढ्या: ₹1,28,850/-
• दख्खनी/स्थानिक मेंढ्या: ₹1,03,545/-
१००० मांस कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट किंवा वैयक्तिक महिला • सर्वसाधारण प्रवर्ग: ५०% अनुदान
• अनुसूचित जाती/जमाती: ७५% अनुदान
• एकूण प्रकल्प किंमत ₹2,25,000/- (पक्षीगृह, स्टोअररूम, उपकरणे, इ.)
• एकूण ₹2,25,000/- (१००० पक्षी क्षमतेचे पक्षीगृह व साहित्य समाविष्ट)
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु. जाती उपयोजना / आदिवासी उपयोजना / क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत २ दुभत्या गायी / म्हशी गट वाटप दारिद्र्यरेषेखालील, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट • अनुसूचित जाती/जमाती: गट किंमतीच्या ७५% अनुदान
• २ दुधाळ गायी / २ म्हशींचे गट वाटप
• गाय: ₹70,000/-
• म्हैस: ₹80,000/-
• २ गायी गट: ₹1,56,850/-
• २ म्हशी गट: ₹1,79,258/-
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु. जाती / आदिवासी उपयोजना अंतर्गत अंशतः ठाणबद्ध शेळी/मेंढी पालन गट वाटप दारिद्र्यरेषेखालील, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट • अनुसूचित जाती/जमाती: ७५% अनुदान
• १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा गट वाटप
• उस्मानाबादी/संगमनेरी शेळी: ₹1,03,545/-
• स्थानिक शेळी: ₹78,231/-
• मडग्याळ मेंढ्या: ₹1,28,850/-
• दख्खनी/स्थानिक मेंढ्या: ₹1,03,545/-
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम : १०० एकदिवसीय पिल्ले वाटप दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक • सर्व प्रवर्गांसाठी ५०% अनुदान
• १०० एकदिवसीय पिल्ले वाटप
• गट किंमत: ₹29,500/-
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम : २५ + ३ तलंगा गट वाटप दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक • सर्व प्रवर्गांसाठी ५०% अनुदान
• २५ + ३ तलंगा गट वाटप
• गट किंमत: ₹10,840/-
तालुका आरोग्य विभाग योजना - पंचायत समिती, सिन्नर

📌 तालुका आरोग्य विभाग - पंचायत समिती, सिन्नर

आरोग्य विभागाशी संबंधित योजना

अ. क्र. योजनेचे नाव लाभार्थी प्राधान्य लाभ / अनुदान अधिक माहिती
कुटुंब नियोजन योजना महिला आणि पुरुष (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील व इतर सामान्य लाभार्थी) • महिला (SC/ST/दारिद्र्यरेषेखालील): ₹600/-
• महिला (सर्वसाधारण): ₹250/-
• पुरुष: ₹1500/-
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर टीएल शस्त्रक्रिया केल्या जातात.
टीएल शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यास थेट मानधन दिले जाते.
आयुष्मान भारत योजना गावातील सर्व नागरिक (आशा स्वयंसेविका मार्फत नोंदणी) • लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड दिले जाते.
• खाजगी रुग्णालयात उपचारासाठी ₹5,00,000/- पर्यंत विमा संरक्षण.
• औषधोपचार व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत.
गाव पातळीवर आशा स्वयंसेविका कार्ड वितरण आणि नोंदणी प्रक्रिया करतात.
मातृत्व अनुदान योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्यरेषेखालील गर्भवती माता (आदिवासी भागात) गर्भवती मातांना रु.400/- मानधन दिले जाते. ही योजना प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागात राबविली जाते.
जननी सुरक्षा योजना गर्भवती माता (दारिद्र्यरेषेखालील व ग्रामीण भागातील) • संस्थात्मक प्रसूतीसाठी ₹700/- अनुदान
• घरगुती प्रसूतीसाठी ₹500/- अनुदान
आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून प्रसूती झाल्यानंतर लाभ दिला जातो.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर-१/२

📌 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर - १ / २

नाविन्यपूर्ण उपक्रम

अ. क्र. राबविलेले उपक्रम उद्देश / वर्णन
टाकाऊ पासून टिकाऊ THR च्या रिकाम्या गोन्यांपासून बालकाच्या नावाने स्वतंत्र पिशवी तयार करणे.
बाहुली घर बालकांमध्ये सामाजिक भावनेचा विकास करणे.
बाल कोपरा कमी वजनाच्या बालकांच्या वजनवाढीसाठी प्रयत्न करणे.
स्तनपानाबाबत प्रशिक्षण IIT चे प्रशिक्षण व्हिडिओ दाखवून मातांना स्तनपानाचे मार्गदर्शन करणे.
परसबाग परसबागेद्वारे शेवगा व इतर भाजीपाला लावून पोषण आहारात वापर करणे.
स्त्री जन्माचे स्वागत मुलगी जन्माला आलेल्या मातेचे स्वागत व कौतुक करून स्त्री जन्म वृद्धीसाठी प्रोत्साहन देणे.
आहार प्रशिक्षण THR पासून पोषक आहार तयार करण्याचे प्रशिक्षण देणे.
पाक कृती प्रदर्शन विविध रानभाज्यांचे पाककृती प्रदर्शन करून त्यांचे पोषण मूल्य सांगणे.

कृषी विभाग पंचायत समिती सिन्नर
कृषी विभागाअंतर्गत जि.प.सेस मधून ५०% मर्यादित अनुदानावर विविध शेती उपयोगी अवजारे खरेदी करणे. व म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत रेशीम उद्योग, डॉ.बाबसाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच बायोगॅस बांधणे.

WhatsApp Image 2026-02-20 at 5.14.16 PM (1)
WhatsApp Image 2026-02-20 at 5.23.46 PM
WhatsApp Image 2026-02-20 at 5.14.15 PM
Scroll to Top